Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिवसेना शिंदे गटाचा ‘शहर मध्य’ वर डोळा ; शिंदेंच्या विरोधात तीन वेळा पराभव, पुन्हा शिंदेच्याच विरोधात नशीब अजमावणार ; शहर मध्यसाठी या नेत्यांची मोर्चेबांधणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 June 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विधानसभा निवडणुक अजून दीड वर्ष असली तरी काही पक्षांनी आता पासूनच मोर्चेबांधणी सुरु केली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या शहर मध्य या मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांमधून मिळाली. शहर मध्य भागात राहणारे जिल्हाप्रमुख मनिष काळजे हे सुध्दा इच्छूक असल्याची माहिती आहे. तसेच राज्याच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना शहर मध्य मधून शिवसेनेने उमेदवारी द्यावी मागणी मोची समाजातून होत आहे.

सोलापूर शहरात शिवराज्याभिषेक दिनाचे मोठं मोठे डिजिटल लावण्यात आले आहेत. त्या फलकांवर शिवाजी सावंत यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. सात रस्ता परिसरात ते पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी माढयाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात 2004, 2009 आणि 2014 साली शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली आहे. या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवाजी सावंत यांनी चांगलीच टक्कर दिली मात्र सुमारे पन्नास हजाराच्या मताधिक्याने त्यांचा पराभव झाला होता. 

जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून विशेष करून शहर मध्यसाठी 5 कोटींच्या निधीची मागणी केली असून त्यापैकी 1 कोटींची कामे मंजूर झाली असल्याचे समजले. प्रा. ज्योती वाघमारे या मोची समाजाच्या आहेत, काँग्रेसच्या विजयामध्ये मोची समाजाचा वाटा महत्त्वाचा असतो, त्यामुळे वाघमारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट द्यावे अशी मागणी होत आहे.

सोलापूर शहर मध्य हा मतदार संघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो 2009, 2014 आणि 2019 या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी हॅट्रिक साधली आहे. युतीमध्ये ही जागा शिवसेनेला जाते. आता राज्यात भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेची महायुती आहे. त्यामुळे शहर मध्य ची जागा शिंदे गट आपल्याकडे घेण्याच्या तयारीत असून प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी जोरदार तयारी सुरू केल्याचे समजते. 

सावंत हे आठवड्यातून किमान तीन-चार दिवस शासकीय विश्रामगृहात तळ ठोकून असतात, शहर मध्य मतदारसंघात चाललेल्या प्रत्येक घडामोडींवर ते लक्ष ठेऊन आहेत. तसेच जिल्हा परिषदेमध्ये ही कार्यकर्त्यांच्या कामासाठी ते ये जा करतात. राज्यातील मंत्रिमंडळात प्रा. तानाजी सावंत हे वजनदार नेते आहेत. ते आपल्या बंधू साठी निश्चित तिकीट आणू शकतात. परंतू माढयातून येऊन शहरात ते कितपत टिकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिनाचा अभूतपर्व उत्साह ; स्वराज्य गुढी उभारून दिन साजरा

Next Post

शहर उत्तरचा आणखीन एक भाजपचा मोठा नेता, पक्ष सोडण्याच्या मार्गावर? बोलावली तातडीची बैठक, कोणता निर्णय घेणार याकडे लागले सर्वांचे लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शहर उत्तरचा आणखीन एक भाजपचा मोठा नेता, पक्ष सोडण्याच्या मार्गावर? बोलावली तातडीची बैठक, कोणता निर्णय घेणार याकडे लागले सर्वांचे लक्ष

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002206
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group