युवासेना कार्यकारणी सदस्य सुजीत खुर्द यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना 22 जानेवारी 2024 रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आले.
यावेळी सुजीत खुर्द म्हणाले, प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सध्या अयोध्येत मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरू आहे. समस्त हिंदू समाजाला अभिमान वाटावा अशी घटना येथे 22 जानेवारी 2024 ला घडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राम मंदिराचा उद्घाटन सोहळा संपूर्ण जगाला पाहता येणार आहे, जानेवारी महिना पुढचा अखंड वर्ष आपल्याला मिळतंय तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार एखादी शासकीय सुट्टी रद्द करून त्याऐवजी 22 जानेवारी 2024 रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी समस्त भारतवासियांना हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी मिळेल.