सोलापूर : “माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा, अन्य कोणी परवानगीशिवाय फोटो वापरू नये, अस शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
एकीकडे असे असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने पक्षातून हकालपट्टी केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे शहर युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी सोलापूरच्या मार्केट कमिटीसमोर नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा बॅनर लावला आहे आणि त्यावर शरद पवार यांचा फोटो वापरला आहे.
याप्रकरणी जुबेर बागवान यांनी आमचे नेते अजित पवार यांच्या सूचनेनुसारच शरद पवार साहेबांचा आम्ही फोटो वापरला आहे असे स्पष्ट केल्याने राजकारणातील संभ्रमता आणखीच वाढली आहे.



















