सोलापूर : अनेक वर्षांपासून दत्त चौक परिसरातील शुभराय मठात सुरू असलेल्या अनेक गरजूंचा आधार आणि महिलांसाठी काम करणाऱ्या उद्योगवर्धीनी या संस्थेचे जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरातील बीसी बॉईज होस्टेलच्या प्रशस्त जागेत स्थलांतर झाले आहे.
शनिवारी याठिकाणी एका स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्योग वर्धिनीच्या प्रमुख चंद्रिका चौहान तसेच त्यांच्या सर्व सोबती आणि उद्योजक केतन वोरा यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी यशोदा डागा, सौ दमानी, उद्योजक राम रेड्डी, रंगनाथ बंग, जयेश पटेल, रणजीत गांधी, किशोर चंडक, राजूसा भूमकर, बी सी बॉईज हॉस्टेलचे अध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, बाबुभाई मेहता, पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या वैशाली कडुकर, आनंद जोशी, सतीश मालु, धीरेन गडा, कल्पेश जव्हेरी, रोटरी परिवार तसेच केतन भाई मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी जेष्ठ मान्यवर यांच्या उपस्थितीत वृक्षांची पूजा करून आणि पाणी घालून या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन झाले. उद्योगवर्धिनी एका चांगल्या आणि प्रशस्त जागेत स्थलांतरित झाल्याबद्दल अनेकांनी चौहान यांना शुभेच्छा दिल्या.
चंद्रिका चौहान यावेळी सर्वांचे स्वागत करताना म्हणाल्या, कोरोना काळात सर्वांनी मिळून खूप चांगले काम केले आहे रोज अडीच हजार लोकांना आपण जेवणाचे डबे देत होतो. सरकारचा एक रुपयाही न घेता वेगवेगळ्या संस्था संघटना यांच्या मदतीने त्यामध्ये रोटरी क्लब, भावसार समाज, गुजराती समाज, काही बँका आणि केतन भाई मित्रपरिवार त्यांनी सर्वांनी मिळून फंड गोळा केले आणि आम्ही डबे देण्याचे काम केले. त्यामुळे सर्वांचे भेट व्हावी आणि एक स्नेहमेळावा या निमित्ताने सर्वांना निमंत्रित केले आहे.





















