Sunday, May 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार ; जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्धार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 July 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडखोरी नंतर महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाले आहेत यानंतर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची पहिलीच बैठक छत्रपती संभाजी महाराज चौकातील फर्न हॉटेलच्या सभागृहात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे होते, सोलापूरचे निरीक्षक शेखर माने, पंढरपूरचे नेते अभिजीत पाटील, मोहोळचे रमेश बारसकर शहराध्यक्ष भारत जाधव, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष कविता म्हेत्रे, जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमाला गायकवाड, महेश माने, प्रल्हाद काशीद, बिपिन करजोळे यांच्यासह तालुकाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेखर माने म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड सुद्धा नाही आणि बंडखोरी पण नाही काही लोक आपल्या स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले आहेत. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि तो शरद पवारांचा आहे त्यामुळे शरद पवारांवर आमचा विश्वास आहे. पक्षातील काही लोक बाहेर पडले असतील मात्र पक्षातील सामान्य कार्यकर्ता पदाधिकारी शरद पवार यांच्या नेतृत्ववर विश्वास ठेवून इथ उपस्थित आहे. काही नेते गेले म्हणून पक्ष जात नाही. पदाधिकारी गेले म्हणून पक्षाला काही फरक पडत नाही एक गेला तर दुसरा येतो. त्यामुळे येणाऱ्या 2024 मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक नंबर वर राहील असा विश्वास व्यक्त करत सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पवारांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा निर्धार आजच्या बैठकीमध्ये केला आहे.

काका साठे म्हणाले, भविष्यात भारतीय जनता पार्टीला देशात एकपक्षीय पद्धती आणायची आहे. कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे त्यांनी सुरुवातीला शिवसेना फोडली आता राष्ट्रवादी फोडली. इतर पक्षही फोडतील आणि देशांमध्ये आपलं बहुमत कसे होणार हे त्यांचे राजकीय षडयंत्र आहे. 2024 ला त्यांच्या हातात सत्ता गेली तर पुन्हा देशात निवडणूका हे नावच राहणार नाही. त्यासाठी आपण सावध राहिले पाहिजे. शरद पवार यांच्या पाठीशी आज आपण आहोत पण ज्यावेळी परीक्षा येईल त्यावेळेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहील तोच सच्चा कार्यकर्ता असणार असे ते म्हणाले.

माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार यांची जिल्ह्यात ताकद नक्कीच राहणार असे सांगून आम्ही रोज लोकांसमोर जात आहे विचारत आहे. आम्ही शरद पवार यांच्याच पाठीशी आहोत असे उत्तर मिळत आहेत. उद्या भाजपच्या स्टेजवर अजित पवार आले तरी त्यांच्या विरोधात लढण्याची आमची तयारी आहे असेही ते म्हणाले.

SendShareTweetSend
Previous Post

पत्रकार समाधान रोकडे यांची पडसाळी गावच्या सरपंच पदी निवड ; Solapur

Next Post

सोलापुरातील उद्योगवर्धिनीचे प्रशस्त जागेत स्थलांतर ; मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेहमेळाव्याने वाढली कार्यक्रमाची शोभा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातील उद्योगवर्धिनीचे प्रशस्त जागेत स्थलांतर ; मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेहमेळाव्याने वाढली कार्यक्रमाची शोभा

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979012
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group