कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणकामी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी आदेश व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना…
मी, पि शिवशंकर, भा.प्र.से. आयुक्त सोलापूर महानगरपालिका, सोलापूर मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व देण्यात आलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टिने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत सोलापूर शहरासाठी यापूर्वी दिनांक २७/०६/२०२१ रोजीचे आदेश व दिनांक २८/०६/२०२१ रोजीच्या शुध्दीपत्रकातील आदेशच दि. १२/०७/२०२१ रोजीचे सकाळी ०७.०० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुध्द संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी.






















