केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणा मुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेला सह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे या जीवघेण्या महागाईच्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरात केंद्र सरकारच्या विरोधात साखळी पद्धतीने काँग्रेस पक्षाचे निदर्शने व आंदोलने सुरू आहेत.
मुंबईमध्ये शनिवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीचे आंदोलन सुरू होते यावेळी माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी बैलगाडीवर सोडून कार्यकर्ते घोषणा देत होते यामध्ये भाई जगताप हेही उपस्थित होते बैलगाडीत एवढं वजन वाढलं की घोषणाबाजी दरम्यान बैलगाडीच तुटली आणि सर्वजण खाली कोसळले पहा हा व्हिडिओ


















