सोलापूर | राज्यात सत्ता असल्याने आगामी महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा वाढल्या आहेत, त्या पद्धतीने मोर्चेबांधणी, संघटन सुरू आहे, सोलापूर शहरात महापालिकेच्या दृष्टीने पद्धतशीर तयारी केली जात आहे. जिल्ह्यात मात्र नेत्यांची तोंड चार दिशेला आहेत, जिल्हाध्यक्ष काका साठे हे राजन पाटील, आमदार यशवंत माने यांना सोडले तर त्यांचे कुणाशी जुळत का नाही असा प्रश्न उपस्थित होतोय, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांची स्वतंत्र टीम तयार होत आहे, दीपक साळुंखे, कल्याणराव काळे हे आपआपल्या पध्दतीने काम करतात, माळशिरस तालुक्यात गटबाजी आहे, उत्तमराव जानकर नाराज झाल्याने तिथली तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त झाली, जिल्ह्यात आमदार बबनदादां आणि आमदार संजयमामा यांचा जिल्ह्यात जादा इंटरफेअर दिसत नाहीत, बार्शी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झाली आहे, मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यात पोटनिवडणुकीच्या निकालाने पक्षाचं चित्र स्पष्ट दिसलं, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात कार्यकर्त्यांची वानवा दिसून येते, दक्षिण मध्ये मात्र बाळासाहेब बंडगर हे तालुका दौरे करत आहेत एकूणच ग्रामीण भागातील अशी परिस्थिती असताना सध्या जिल्ह्याची महिला कार्यकारिणी निवडली जाणार आहे, अनेक तालुक्याच्या निवडी होणार आहेत, अनेकजण इच्छुक आहेत, पालकमंत्री हा पक्ष आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयक असतो, मात्र पालकमंत्री दत्तामामा यांना सोलापूर जिल्ह्यातील पक्ष संघटन, बांधणीचे काही देणे घेणे नसल्याचं दिसून येतंय, शुक्रवारच्या दौऱ्यात त्यांना जिल्ह्यात पक्ष संघटनेत बदल होणार का? निवडीत लक्ष घालणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सरळ सरळ त्यांनी जबाबदारी झटकली पहा ते काय म्हणाले…
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...














