“जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घ्यायला सर्व सदस्यांनी विरोध दर्शवला प्रशासनाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले”.
सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही सोमवार 12 जुलै रोजी घेण्याचा निर्णय अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी घेतला मात्र शुक्रवारी दुपारी अचानक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खुल्या जागेत घेण्याऐवजी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने केल्या, यामुळे जिल्हा परिषद सदस्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालं सोमवारची सभाही ऑफलाइन पद्धतीने घ्या यासाठी सदस्य आक्रमक झाले ऑनलाइन सभा घेतल्यास ती बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सर्व सदस्य एकत्रित जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आले त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
यामध्ये सांगोल्याचे एडवोकेट सचिन देशमुख यांनी पुढाकार घेतला.सदस्य सुभाष माने अरुण तोडकर उपाध्यक्ष दिलीप चव्हाण भारत शिंदे मदन दराडे त्रिभुवन धाईंजे स्वाती कांबळे रेखा राउत सभापती रजनी भडकुंबे सदस्य मल्लिकार्जुन पाटील अण्णाराव बाराचारे शिवाजी सोनवणे दादासाहेब बाबर मंजुळा कोळेकर माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील नितीन नकाते, काका साठे यांनी प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी केली
यावेळी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे तेसुद्धा सदस्यांमध्ये येऊन बसले, दरम्यान सदस्यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला केवळ आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही सभा ऑनलाइन घेतली जात आहे जोपर्यंत सभा तहकूब होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार असा इशारा दिला..
अध्यक्ष कांबळे यांनी सभेचे सचिव परमेश्वर राऊत यांना बोलावून घेतले त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधला अध्यक्ष कांबळे यांनी सभा तहकूब केल्याची घोषणा केली..


















