सोलापूर विजापूर रोड वरील कंबर तलाव अर्थात संभाजी तलावात मागील महिन्या दोन महिन्यांपासून दोन ते तीन मृतदेह आढळून आले आहेत.अनेकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हा तलाव सध्या मृत्यूचा सापळा झाल्याचं चित्र आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास आणखी एक इसमाचा मृतदेह मिळून आला मृतदेहाची ओळख पटली असून त्याचे वय सुमारे पन्नास वर्ष असून तो विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक एक या ठिकाणचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना ही माहिती मिळताच लादेन यांची ऍम्ब्युलन्स बोलावून घेऊन तो मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.
यापूर्वी एका बांधकाम कामगाराचा मृतदेह कंबर तलाव मध्ये आढळून आला होता त्यानंतर एक महिला अर्धमेल्या अवस्थेत कंबर तलावात तरंगताना आढळून आली. यावरुन हा तलाव धोकादायक झाल्याचं बोललं जातंय तलावाच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक नसल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

















