अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर, तालुका मोहोळ असे त्या शेतकऱ्यांचे नाव आहे. अनिल पाटील हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे, त्यांनी अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करत गोंधळ घातला आहे,
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिलेल्या पत्रात पाटील यांनी म्हटले, शिरपूर या गावांमध्ये माझ्या स्वतःची दोन एकर जमीन आहे त्यामध्ये गांजा लागवडीला परवानगी द्यावी कारण सध्या कोणत्याही पिकाला हमीभाव नाहीत त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे गांजा लावल्यास त्याला भाव मिळतो शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील म्हणून गांजा लागवडीस परवानगी द्यावी.
15 सप्टेंबर 2021 पर्यंत आपण मला परवानगी द्यावी अन्यथा 16 सप्टेंबरपासून आपली परवानगी मिळाली असे गृहीत धरून मी गांजा लागवड करेन पुढे जे होईल त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहील असा इशारा अनिल पाटील यांनी पत्रामध्ये दिला आहे.



















