सोलापूर : सदर बझार पोलीस ठाणे भादंवि ३८० मधील पाहिजे असलेला आरोपी नामे शशिकांत ऊर्फ पिल्या अनिल राक्षे, हा घरफोडी चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने घेवुन थांबला आहे, अशी बातमी मिळाल्याने एपीआय निखिल पवार व त्यांच्या पथकाने रेकॉर्डवरील आरोपी शशिकांत ऊर्फ पिल्या अनिल राक्षे, वय ४३ वर्षे, रा. तांबी, रणसम्राट चौक, देशमुख हॉस्पिटल जवळ, उस्मानाबाद, यास शिताफिने ताब्यात घेवून चौकशी केली असता
त्याने सदर बझार पोलीस ठाणे भादंवि ४५४,४५७,३८०, फौजदार चावडी पोलीस ठाणे भादंवि ४५४,४५७,३८०, विजापूर नाका पोलीस ठाणे भादवि ४५७, ३८०, सदर बझार पोलीस ठाणे भादंवि ३८० व एम.आय.डी.सी. पो.स्टे. भादंवि-४५७,३८० असे घरफोडीचे व उघड्या घरातील चोरी करून गुन्हे केल्याचे कबुल केले त्यास २७/०८/२०२१ रोजी अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी घरफोडी गुन्ह्यातील २१.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रक्कम रुपये.६१,०००किंमतीचे व ४०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने रक्कम रुपये २४,००० किंमतीचे व चोरीच्या गुन्ह्यातील एक टायटन कंपनीचे मनगटी घड्याळ रूपये १००० असा एकूण रक्कम रुपये ८६,००० किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व घड्याळ असा मुद्देमाल हस्तगत करुन करून ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, पोलीस अंमलदार अजय अडगळे, संतोष फुटाणे, शितल शिवशरण, सचिन बाबर, विजयकुमार वाळके, संदिप जावळे, विनायक बर्डे, श्रीकांत पवार, राहुल तोगे, चालक पोलीस हवालदार संजय काकडे व दत्तात्रय ढेकणे यांनी केली आहे..



















