सोलापूर : एमआयएमचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादात यांचा रविवारी दौरा झाला, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व होते, या दौऱ्यात अन्वर सादात यांच्यापेक्षा शहराचे अध्यक्ष फारूक शाब्दी यांचा जोश जास्त होता, दौरा पक्ष निरीक्षकांचा मार्केट मात्र मारलं शाब्दी यांनीच. त्यांच्याच भाषणाची चर्चा झाली,
नगरसेवक गाझी जहागीरदार यांच्या निधीतून बोअरचे उद्घाटन झाले. नगरसेवक अझहर हुंडेकरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन, गटनेता रियाज खरादी यांच्या मतदार नोंदणीचे उद्घाटन, मोहसीन मैंदरगीकर यांचा युवा मेळावा असे अनेक कार्यक्रम झाले. यावेळी शाब्दी यांनी आपल्या सहकारी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे तोंड भरून कौतूक तर केलेच पण कुणाचे नाव न घेता चिमटे ही काढले पहा हे व्हिडीओ
1 गाझी जहागीरदार यांचे कौतूक
2 तौफिक पैलवान यांना चिमटे
3 उत्तर मध्ये एमआयएम खाते उघडणार



















