सोलापूर : काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते, वडेट्टीवार हे महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन या विभागांचे मंत्री आहेत. त्यांनी सोलापुरातील एसबीसी या प्रवर्गाच्या विविध प्रश्नासाठी बैठक लावली होती त्या बैठकीला समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती बैठकीनंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले शिवसेनेचे नेते महेश कोठे हे आपल्या काही समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बराच वेळ वडेट्टीवार यांच्या भेटीसाठी बाहेर थांबले होते शेवटी त्यांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला यानंतर पत्रकारांशी बोलताना कोठे यांनी ही माहिती दिली….


















