Saturday, October 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेसच्या सुदीप चाकोते यांची भीमगर्जना ; जबाबदारी द्या माझ्यावर साहेब….., एवढा कॉन्फिडन्स आला कुठून?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : 2014 मध्ये काँग्रेस पक्षाची देशात आणि राज्यातून सत्ता गेली, 2019 मध्ये ही देशात पुन्हा भाजप सत्तेवर आले, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मरगळ आली, सोलापूरात शिंदे साहेबांचा दोन वेळा पराभव हे तर सोलापूरच्या काँग्रेसचा सर्वात वाईट काळ, अनेकजण पक्ष सोडून गेले, नवे कुणी येईना.मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्याने खरे तर काँग्रेसला उर्जितावस्था मिळाली. सोलापूरात आमदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम चालत आहे. यामध्ये युवा नेते सुदीप चाकोते यांनी बाजी मारली आहे. कुणाच्या ध्यानी मनी नसताना थेट राहुल गांधी यांच्या कडूनच सेवादल यंग ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पद आणले. ही सोलापूर साठी अभिमानाची गोष्ट होती . वाटेत त्यांनी कोणता स्पीडब्रेकर न घेता असा शॉर्टकट मारला की सर्व बघतच राहिले. या निवडीबद्दल सुदीप चाकोते यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

सोलापूर शहरात ही ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सुदीप यांचा सत्कार झाला, यावेळी सुदीप यांनी आपल्या भाषणात भीमगर्जना केली, साहेब मला, जबाबदारी द्या, एका मतदारसंघाची द्या, तालुक्याची द्या, शहराची द्या, जिल्ह्याची द्या, वाटेल तर राज्याची द्या,पण द्या कुणालाही एक पैसा मागणार नाही, स्वतः खर्च करेन पण रिझल्ट दाखवेन. एवढं धाडस सुदीप चाकोते यांच्यात निर्माण झाले आहे. आणि याच धाडसाची काँग्रेसला आताच्या परिस्थितीत गरज आहे. कोरोना काळात सुदीप चाकोते यांनी कांचन फाउंडेशनच्या माध्यमातून  मोठे सामाजिक कार्य केले, हजारोना मदत केली, आरोग्याची काळजी घेतली, सहकार्य केले आहे. विविध शिबिरे, उपक्रम राबविले आहेत.

आगामी काळात सोलापूर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, शहर उत्तर या मतदारसंघात काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही, महेश कोठे यांच्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, आता उत्तरमध्ये सुदीप चाकोते यांच्यासारख्या युवा नेतृत्वावर पक्षाने जबाबदारी देण्याची गरज असल्याची पक्षात चर्चा आहे, एकट्या आमदार प्रणिती ताई किती पळणार,जबाबदाऱ्या निश्चित झाल्या पाहिजे असे कार्यकर्ते म्हणत आहेत.

काँग्रेस पक्षाने मागील काही दिवसापूर्वी प्रदेशच्या निवडी केल्या त्यामध्ये विशेष करून धनगर समाज आणि लिंगायत समाजाला प्राधान्य दिले आहे सोलापूर शहरांमध्येही लिंगायत समाजा कडे सध्या महत्त्वाची पदे आहेत त्यामुळे 2017 च्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पासून दूर गेलेला लिंगायत समाज पुन्हा या निवडणुकीत पक्षाकडे आणण्याची मोठी जबाबदारी चाकोते तसेच वाले यांच्यावर आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! गोरख शेलार यांची बदली, स्मिता पाटील पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी

Next Post

तर…,महेश कोठे-तौफिक शेख-आनंद चंदनशिवे यांची राष्ट्रवादीला काय गरज ; राष्ट्रवादीच्या या नेत्यांकडून ही भाषा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

तर...,महेश कोठे-तौफिक शेख-आनंद चंदनशिवे यांची राष्ट्रवादीला काय गरज ; राष्ट्रवादीच्या या नेत्यांकडून ही भाषा

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002250
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group