काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री माजी राज्यपाल सोलापूर चे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे यांचा चार सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो आजपर्यंत साहेबांच्या जीवावर पदे भोगलेल्या पदाधिकारी नगरसेवक आपापल्या परीने वाढदिवस साजरा करतात, काहीजण तर विशेष म्हणजे माजी महापौर, स्थायी समिती सभापती, साहेबांच्या मागं-मागं फिरणारे असे नेते साहेबांच्याच वाढदिवसाला हात आखडता घेतात, पत्रकारांचे फोन उचलत नाहीत मात्र काँग्रेसमध्ये एक असा कार्यकर्ता आहे ज्यांनी आजपर्यंत कोणतेही मोठे पद भोगलेला नाही तो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आपल संपूर्ण आयुष्य त्याने पक्षाच्या कार्यामध्ये घातले आहे. कधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात किंवा शहराध्यक्षच्या विरोधात ते भाषा करत नाहीत मात्र त्याचं सुशीलकुमार शिंदे हे प्रेम कायम आहे.
आपल्या हैसीयत प्रमाणे दरवर्षी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवनात केक कापण्याचा कार्यक्रम होतो तो कार्यकर्ता म्हणजे ज्येष्ठ नेते अंबादास गुत्तिकोंडा होय. गुत्तीकोंडा यांचा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्याचा कार्यक्रम अविरत सुरु आहे तो शनिवार चार सप्टेंबर रोजी ही कायम होता त्यांच्या कार्यक्रमाला सर्वच पदाधिकारी प्रेमाने आवर्जून उपस्थिती दर्शवतात.
दुसरीकडे सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी सुशिलकुमार शिंदे यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत
सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे 25 बाय 45 फुटाची भव्य रांगोळीतून शिंदे साहेब दिल्ली येथील लाल किल्ल्यावर भाषण करत असल्याची प्रतिकृती साकारण्यात आली. या रांगोळीचे उद्घाटन माजी आमदार प्रकाश यलगुलवार,सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या रांगोळीतुन नागणे यांनी सोलापूरकरांचे ते स्वप्न लवकरच पूर्ण होवो , सोलापूरचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी कर्तृत्व व पक्षनिष्ठेच्या जोरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ते केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. आता येणाऱ्या काळात साहेब देशाचे पंतप्रधान व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिली.



















