सोलापूर : जागा विक्रीचे पैसे न देता परस्पर प्लॉट विक्री करून पैसे घेतल्याबद्दल एमआयडीसी पोलीस ठाण्यात काँग्रेस नगरसेवकांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफ इमामसाब नदाफ वय ४२ राहणार न्यु पाच्छा पेठ सिव्हील चौक, रियाज इब्राहिम हुंडेकरी वय ५५. व्यवसाय व्यापार राहणार न्यु ति-हे
गाव फॉरेस्ट सोलापुर, अब्दुल मतीन अ. रीफ हकिम वय ३८, राहणार सिध्देश्वर पेठ, सोलापुर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दिनांक २० सप्टेंबर रोजी सय्यद फजलुल्ला कलीमुल्ला खतीब, वय ६९ वर्षे, व्यवसाय शेती, उत्तर कसबा, बाबा कादरी मस्जीद समोर, सोलापुर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यात हकिकत अशी की, आराफत इन्फ्रास्ट्रक्चर चे भागीदार आरोपी आरिफ इमामसाब नदाफ व अब्दुल मतीन अ. रीफ हकिम यांनी डेवलपमेंट अॅग्रीमेंट नुसार फिर्यादीचे व भावाचे नावे असलेली सोलापुर महानगर •पालीकेच्या नवीन हद्दवाढीतील डी व सब डी तालुका उत्तर सोलापुर पैकी १. जुना सर्वे नं १४९/१ अ.नवीन सर्वे नं १४७/१ अ क्षेत्र एक हेक्टर ५० आर.२. जुना सर्वे नं १५०/१ व/२अ नवीन सर्वे नं १४८/१६/२अ क्षेत्र ०.८१ आर या जागे मधील प्लॉट नं ४.५.६.११.१२. क्षेत्र ३६४६.९ चौ मी ही जागा विकसीत न करता करार पत्राचा मंग करुन व करारानुसार ठरलेली रक्कम न न देता फसवण्याच्या उद्देशाने बँकेत पेस नसताना धनादेश देवून फसवणुक केली आहे.
फिर्यादीने करुन दिलेल्या कुल मूखत्यार पत्राचा गैरवापर करून सदर मिळकत ही परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने हुतात्मा नगरी या नावाने ब्राउशर काढले व त्यातील काही प्लॅटच्या बुकिंग करीता लोकांकडुन परस्पर पैसे घेतले आहेत असे समजले आहे, तसेच नमुद मिळकत विकसीत करण्याऐवजी या ठिकाणी विकास कामाला अडथळा येईल असे कृत्य करून शिवीगाळ व दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देवुन, फिर्यादीचा विश्वास घात करून फसवणुक केली आहे हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून फौजदार शिंदे हे तपास करीत आहेत.














