भाजी घेऊन पायी चालत जाणारी एक वृद्ध महिला ट्रॅव्हल वाहनाखाली येऊन गंभीर जखमी झाली ही घटना छत्रपती रंगभवन चौकात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. महिलेचे नाव समजू शकले नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अकराच्या सुमारास एक वृद्ध महिला भाजी घेऊन पायी चालत जात होती त्याच वेळेस सात रस्ता वरून रंगभवन चौकाकडे एम एच 04 8118 क्रमांकाची पटेल ट्रॅव्हल्स येत होती दरम्यान त्या ट्रॅव्हल्सची धडक त्या महिलेला बसली आणि पुढील उजव्या हाताखाली ती महिला आली तिच्या पायावरून ट्रॅव्हलचे चाक गेल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे.
घटना घडताच ट्रॅव्हल्स चालक ट्रॅव्हल तशीच रस्त्यात आडवी सोडून पळून गेला आहे, घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन दाखल झाले त्याचबरोबर वाहतूक शाखेचे पोलीस दाखल झाले, जखमी महिलेला त्वरित ऍम्ब्युलन्स मध्ये घालून सिविल हॉस्पिटल कडे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
रस्त्यावर ट्रॅव्हल आडवी लागल्याने बराच वेळ वाहतूक खोळंबली होती, ट्रॅव्हलच्या दोन्ही चाकांमध्ये रक्ताचा सडा पडला होता, बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
















