Sunday, September 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गौरवास्पद : शेतकऱ्यांनी दोन पोरं जिल्हाधिकारी होणार ; सोलापूर जिल्ह्यातील 3 युवकांचे “यूपीएससी” परीक्षेत यश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 September 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : वाघोली (ता. माळशिरस) येथील भारत जालिंदर मिसाळ या शेतकऱ्याचा मुलगा सागर भारत मिसाळ यांनी UPSC च्या परीक्षेत ३५४ रँकने पास होऊन यश संपादन केले आहे.

या पूर्वी २०२० मध्ये सागर मिसाळ यांनी UPSC च्या परीक्षेत २०४ रँकने यश मिळवले होते. त्यांची उत्तराखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झाली होती. जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न मनाशी बाळगून सागर मिसाळ यांनी हा दुसरा प्रयत्न केला होता. त्यातही त्यांनी यश प्राप्त केले. या यशाबद्दल सागर मिसाळ यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

सागर मिसाळ हे एक गरीब शेतकरी कुटुंबातील असून थोड्या फार शेतीत आई वडिलांनी कष्ट करून त्यांना व त्याच्या लहान भावाला शिक्षण दिले. भारत मिसाळ यांचा दुसरा मुलगाही UPSC चा अभ्यास करीत आहे.

सागर मिसाळ यांचे प्राथमिक शिक्षण वाघोली (ता. माळशिरस) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे झाले असून कृषी पदवी घेऊन ते UPSC चा अभ्यास करीत होते.

सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या शिंदेवाडी गावात राहणाऱ्या शुभम जाधव याने UPSC च्या परीक्षेत ४४५ वा क्रमांक मिळवला आहे. शुभम जाधव यांचे आई-वडील शेती करतात. पाचव्या प्रयत्नांमध्ये त्यांना हे यश मिळवले आहे. त्यांनी आधी तीन वेळा मुलाखतीपर्यंत मजल मारली होती.

सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचालित दि मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर या ठिकाणी शुभम जाधव यांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले.

काहीतरी यश माझ्या हाताला लागलं आहे. एवढ्या वर्षांची प्रतीक्षा फळाला आली. आईवडील, नातेवाईक आणि गुरुजनांच्या पाठिंब्यांमुळे हे शक्य झालं. माझे आत्ये भाऊ अमोल क्षीरसागर यांनी मला मला फार मदत केली. पाठिंबा दिला, प्रोत्साह दिलं. त्यामुळे इथपर्यंत पोहोचणं शक्य झालं आहे, असं शुभम जाधव यांनी सांगितले.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झालो. पण जिल्हाधिकारी होण्याची इच्छा होती. त्यामुळे यूपीएससीची तयारी सुरूच होती. शिक्षण सुरू असताना दोन वेळा यूपीएससी परीक्षा दिली, पण यश आले नाही. आता तिसऱ्या प्रयत्नांमध्ये मात्र यश प्राप्त झाल्याचे बार्शी येथील अजिंक्‍य विद्यागर यांनी दीड वर्षापूर्वी म्हटले होते. आता अजिंक्य यांनी दुसऱ्यांदा UPSC परीक्षा पास होत बार्शीत इतिहास घडवला.

पहिल्यांदा UPSC क्रॅक केल्यानंतर रेल्वे सेवेत अधिकारी असलेले अजिंक्य आज दुसऱ्यांदा UPSC परीक्षा पास झाले आहेत. सध्या ते गुजरातच्या वडोदरा येथे कार्यरत आहेत. आता दुसऱ्यांदा UPSC परीक्षा पास होऊन देशात 617 वी रँक मिळवत ते उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे IPS होण्याचं त्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

अजिंक्‍य यांचे वडील प्रा. अनंत विद्यागर हे बार्शी येथील बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमधून सेवानिवृत्त झाले आहेत तर आई आशा जोगदंड-विद्यागर आगळगाव येथे मुख्याध्यापिका आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

भाजप आंदोलनाला राष्ट्रवादी युवकचे जोरदार उत्तर ; प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर यांनी घेतले फैलावर

Next Post

ब्रेकींग : ट्रॅव्हलखाली महिला येऊन गंभीर जखमी ; रंगभवन चौकातील सकाळची घटना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : ट्रॅव्हलखाली महिला येऊन गंभीर जखमी ; रंगभवन चौकातील सकाळची घटना

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000625
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group