सोलापूर : सीना नदीला पुन्हा पुर आल्याने संजवाड औराद यासह अन्य दक्षिण तालुक्यातील सीना नदी पात्रातील पुलावरती पाणी आल्याने जाण्या येण्याचे मार्ग बंद झाले आहे.
मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीला पुन्हा पूर आला आहे, नदी काठावरील संजवाड, औराद आणि राजूर यासह अन्य गावांचा संपर्क तुटला आहे, औराद,संजवाड,राजूर यासह अन्य गावातील नदीकाठावरील शेतात पाणी आले आहे. सीना नदीला पुरआल्याने नदीकाठी असलेले शेतातील पिकामध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आधीच अडचण मध्ये असलेले शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.
















