भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सोमवारी छत्रपती संभाजी महाराज चौकांमध्ये मोठ्या गर्दीने येऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांना आव्हान दिले. घोषणाबाजी केली, यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते
सोलापुरात दिवसभर याच प्रकरणाची चर्चा ऐकण्यास मिळाली दरम्यान सोलापूर शहरात तोरणा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राजकीय कार्यक्रमाला प्रतिबंध असताना यातील बेकायदेशीररित्या एकत्रीत येवुन सार्वजनिक रोडवरील वाहन धारकाना येणे जाणेस अडथळा आणुन कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंधाने एक मेकात सोशल डिस्टन्स न ठेवता ओबीसी आरक्षण रद्द केल्याने निषेधार्थ आघाडी सरकार विरोधात जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख पुरुषोतम बरडे यांनी भाजपा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे संबंधाने वक्तव्य केले होते
त्याचे निषेधार्थ तसेच ओबीसी समाजाला आरक्षण मिळणे कारणावरून घोषणाबाजी करुन इतराचे जीवीतास धोका निर्माण होईल असे हयगयीचे कृत्य करून महापालिका आयुक्तांच्या आदेशाचे उल्लघन केले म्हणुन भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह चौदा प्रमुख पदाधिकाऱ्यांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















