राज्याचे गृह, परिवहन राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांना दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अनंत म्हेत्रे यांनी भेटून निवेदन दिले. मंद्रूप दक्षिण सोलापूर येथे नवीन बस स्टँड निर्मिती करण्याची मागणी त्यांनी केली,
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय असल्याचे लक्षात आल्यावर राज्यमंत्री बंटी पाटील यांनी तात्काळ परिवहन महामंडळाचे DC (Divisional Controller, Solapur District) यांना त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले, या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आदेश दिल्याबद्दल मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करण्यात आले व मंद्रूप या गावामध्ये लवकरात लवकर बस स्टँड उभारण्यात येईल अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या.

















