सोलापूर : कॉंग्रेस पक्षाच्या माजी महापौर नलिनी चंदेले यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेस पक्षातील अनुभवी आणि माजी महापौर असलेल्या नलिनी चंदेले यांचे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे उपाध्यक्ष लता फुटाणे, वंदना भिसे, लता ढेरे, नीला खांडेकर मनीषा नलावडे, वसीमताई खान, सुनंदा साळुंखे, राजेश्री कांबळे उपस्थित होत्या.
विद्या लोलगे म्हणाल्या, काँग्रेस पक्षात माजी महापौर माजी प्रदेशाध्यक्षा असे पद भूषवलेल्या नलिनी चंदेले यांचा महापालिका निवडणुकीत 50 टक्के महिला आरक्षण असल्याने तिकीट वाटपात त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे, प्रदेशवर त्या काम केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा उपयोग होणार आहे.
सत्काराला उत्तर देताना नलिनी चंदेले म्हणाल्या, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करेन, विद्या लोलगे माझ्या आदर्श आहेत, मी राजकारण नसताना त्यांचे काम पहात होते, त्यांचा उत्साह पाहून काम करण्याची ऊर्जा मिळते, त्यांचे मार्गदर्शनाखाली काम करून सोलापूरात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे हात बळकट करून महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणू.

















