सोलापूर : एका पंधरा वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.
अजय युवराज गाडीवाले वय 19 राहणार लक्ष्मी मंदिर जवळ हेजनपुर, लष्कर, सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी युवकाचे नाव आहे
उत्तर सदर बझार भागातील हेजनपूर शाळेजवळ राहणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून आपल्या सोरेगाव इथल्या शेतात नेऊन ऑगस्ट 2020 ते 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान वारंवार बलात्कार केला. 16 ऑक्टोबर रोजी पिडीत मुलगी ती अल्पवयीन मुलगी काल शनिवारी सकाळी घरातून गेली होती.
दुपारी परतल्यानंतर तिला विचारपूस केली असता अजय बाडीवाले याने तिला लग्नाचे आमिष दाखवून सोरेगाव येथील त्याच्या शेतात नेला होता. आणि अत्याचार केल्याचे सांगितले. हा प्रकार तो ऑगस्ट२०२० पासून करत होता असे निष्पन झाले. या घटनेची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी सदर बाजार पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी पोक्सो अधिनियमा प्रमाणे आरोपीला अटक करून कोठडी घेतली. फौजदार गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

















