सोलापूर : देशातील पहिले संविधान भवन नार्थकोट मैदानात उभारण्यात यावे यासाठी प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मागणी प्रस्तावसह अनुसूचित जाती कल्याण समिती प्रमुख आमदार प्रणिती शिंदे, खासदार सुप्रिया सुळे,राज्याच्या शिक्षण मंञी वर्षा गायकवाड व उच्च व तंत्रशिक्षण मंञी उदय सामंत, राज्याचे नगरविकास मंञी एकनाथ शिंदे आमदार रोहित पवार, तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना समक्ष भेटून “प्रयास”चे सचिन शिंदे यांनी निवेदन सादर केले होते.
संविधान भवन उभारण्यासंदर्भात प्रयास संस्थेची संकल्पना मांडून सविस्तर चर्चा करण्यात आली होती.प्रयास संस्थेच्या प्रस्तावाची वेळो वेळी पाठपुरावा केला असता सदर संकल्पनेचे महत्व ओळखून समाजामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची रुजुवणूक व्हावी या अनुशंघाने शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात संविधान सभागृह उभारण्यात येत असून याबाबत शासन आदेश दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२१ रोजी पारित करण्यात आला. यामुळे प्रयास मागासवर्गीय संस्थेच्या मागणीची व प्रस्तावाची दखल घेत भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी त्यांचे व महाराष्ट्र शासनाचे विशेष आभार मानत प्रयत्नाना यश मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.
दरम्यान प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार मधील सर्वच नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत देशातील हा पहिलाच उपक्रम आहे त्यामुळे पुढे पुढे होऊन फोटो काढून काही नेत्यांनी फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा चिमटा त्यांनी काही नेत्यांना काढला.

















