सोलापूर : गुरुवारी एमआयएम शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या प्रमुख उपस्थितीत लष्कर परिसरातील कुरेशी गल्ली इथले कार्यकर्ते सादिक कुरेशी यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला, यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमास नगरसेवक गाजी जहागीरदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणामध्ये फारूक शाब्दी यांनी पक्षातीलच विरोधकांना चिमटे काढले मी केवळ एमआयएम मधून त्यांची हकालपट्टी करेन मात्र मला अपेक्षित आहे या जनतेने त्यांना हाकलून लावावे आणि ही जनता निश्चितच येणाऱ्या निवडणुकीत हे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापालिकेच्या निकाला नंतर सोलापुरात एमआयएमची पतंग उंचच उंच उडेल यात कोणतीही शंका नाही अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली..पहा काय म्हणाले फारूक शाब्दी
















