सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी हे पद जिल्हा परिषदेला धार्जिन नाही असे चित्र मागील बऱ्याच वर्षापासून पाहायला मिळते. आलेला समाजकल्याण अधिकारी एक ते दीड वर्षाच्या वर राहत नाही एक तर त्याची बदली होते अन्यथा तो अधिकारी विनंती बदली करून जातो.
मागील सहा वर्षांमध्ये सहा समाज कल्याण अधिकारी बदललेले आहेत त्यामध्ये तीन वेळा तर अतिरिक्त पदभार दिला गेला आहे यापूर्वी समाजकल्याणचा अतिरिक्त पदभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे यांच्या नंतर उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांच्याकडे पदभार होता त्यामध्ये परमेश्वर राऊत यांनी समाज कल्याणला काही प्रमाणात शिस्त लावली होती.
आता पदावर असलेले संतोष जाधव यांनी चांगल्या पद्धतीने कामकाज सुरू केले मात्र त्यांनी पुण्याला विनंती बदली करून घेतली त्यांच्या जागेवर पर्यायी व्यवस्था शासनाने केली आहे मात्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी जाधव यांना काही दिवस थांबवले तरी जाधव थांबण्यास तयार नाहीत त्यांनी वारंवार विनंती करून सोडण्याची विनंती केली.
दरम्यान आता याच पदावर सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दावा करत ते अतिरिक्त पद आपल्याकडे मिळवण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. समाज कल्याण अधिकारी पद मिळण्यासाठी चंचल पाटील यांनी मंत्रालय स्तरावर प्रयत्न केल्याची चर्चा जिल्हा परिषद मध्ये आहे. गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चंचल पाटील यांना समाज कल्याणचा पदभार घेण्याची सूचना केली,
एकूणच समाज कल्याणचा पदभार मिळण्यासाठी अधिकार्यांचा इतका प्रयत्न कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो दरम्यान आता समाज कल्याण मधील एकाच टेबलवर 4 ते 5 वर्ष चिटकून बसलेल्या अधिकाऱ्यांवर लक्ष घालणार असल्याचे “स्वामी”नी सांगितले.
















