सोलापूर : मागच्या काही महिन्यांपूर्वी बिबट्याने मोहोळ तालुक्यात दहशत माजवली होती,आता हा बिबट्या पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव परिसरात आपली दहशत पसरवत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव परिसरात एका दूध घेऊन जाणार्या पीक अप वाहनावर बिबट्या अदृश्य प्राण्याने झेप घेतल्याची बातमी पसरताच वन विभागातर्फे सावध राहण्याच्या सूचना गावकऱ्यांना देण्यात आल्या,परंतु काल रात्री बिबट्याने आपला डाव साधला आणि दशरथ चव्हाण यांच्या शेतात बांधलेल्या जरशी गाईवर त्याने हल्ला करून त्या गाईचा फडशा पाडला, त्यामुळे या परिसरात सध्या भीतीचे वातावरण असून वनविभाग बंदोबस्त करण्याच्या प्रयत्नात आहे.
















