अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी गावातील जागृत संजीवनी समाधी श्री सद्गुरू मंगलदास महाराज यात्रेनिमित्त मंगलनगर मित्र परिवार व्हाट्सअप ग्रुप कल्लप्पावाडी व बिरलिंगेश्वर बहुद्देशीय सामाजिक संस्था कल्लप्पावाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच इरप्पा डोणे होते, कार्यक्रमाचे उद्घाटन महेश जानकर यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री मंगलदास महाराज फोटो पूजन श्रीशैल वाघमोडे यांचे हस्ते व श्री बिरलिंगेश्वर महाराज फोटो पूजन संजय पांढरे यांचे हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन महेश कोकरे, मारुती सोनकर हस्ते करण्यात झाले. यावेळी जयकुमार जानकर, शिवानंद जालवादी, मुकेश जानकर मुतपा परमगोळ हे उपस्थित होते. यावेळी दमाने ब्लड बँक सोलापूर यांनी रक्त संकलन केले, शिबिरात 74 जणांनी रक्तदान केले
बिरु पुजारी यांच्या श्री मंगलदास लॅबोरेटरीच्या वतीने मोफत मधुमेह तपासणी ठेवण्यात आली त्यात 60 जणांची शुगर तपासणी झाली .
मंगल नगर मित्र परिवार बिरलिंगेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्था सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


















