सोलापूर : जुना विडी घरकुल भागातील मुस्लिम समाजातील सर्वधर्मसमभाव जपणारे सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर महेश कोठे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे रियाज मोमीन यांचा मंगळवारी वाढदिवस साजरा झाला. रियाजभाईं यांच्यावर वाढदिवसा दिवशी सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.
रियाज मोमीन मित्र परिवाराच्या वतीने जुना विडी घरकुल भागात वाढदिवसानिमित्त सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आयटी पार्कच्या नियोजनामध्ये अतिशय व्यस्त असतानाही माजी महापौर महेश कोठे यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कोठे यांच्या समवेत बिज्जू प्रधाने यांचीही उपस्थिती होती. अजित पवार गटाचे सोलापूर शहर युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनीही उपस्थिती लावून रियाज भाई यांना शुभेच्छा दिल्या.
मीम बॉईज, बाबा ग्रुप व टी एस ग्रुप तर्फे ‘आपला नगरसेवक कसा असावा’ अशी रियाज मोमीन यांच्या सामाजिक कार्याची महत्त्व सांगणारी प्रतिमा भेट दिली. या भेटीने मोमीन अतिशय भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.
रियाज मोमीन यांना वाढदिवसानिमित्त गफूर शेख, उद्योजक जी.के.बिल्डरचे मालक गुरू कापसे, अप्पू खुने, संतोष सोमा, जुबेर तांबोळी, अय्युब भडकल, मुजीब बागवान, गौस बागवान, मशाक कारभारी, राजू चौहान, गिरीश कोटा, राकेश पुंजाल, जावेद शेख, आनंद अन्नम, मौलाना इरफान, रईस मुल्ला, साबीर बेदरे, संतोष वालीकर, मतीन बागवान व मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.