Saturday, September 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : क्या रे “बागवान” तुने तो हम सबको “जलील” कर दिया | Special Report |

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 November 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (प्रशांत कटारे) मंगळवार दिनांक 16 नोव्हेंबर हा दिवस अक्कलकोट तालुक्यासाठी अनेक कुटुंबासाठी घातक ठरला. अनेक कुटुंब उध्वस्त झाली, होत्याचं नव्हतं झालं, आपल्या मोबाईलवर बोलण्याच्या नादात सहा जणांचा जीव घेणाऱ्या जीप चालक ‘बागवान’ ने तर सर्वानाच ‘जलील’ केले. 

महाराष्ट्रात सध्या एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. संप इतका तीव्र झाला आहे की, रस्त्यावर एक सुद्धा एसटी धावताना दिसत नाही त्यामुळे विशेष प्रमुख करून ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतं. एसटी प्रशासनाने काही स्कूल बस रस्त्यावर उतरून पर्यायी व्यवस्था करून दिली असली तरी ती तोकडी पडत आहे. याच अवैध प्रवासी वाहतुकीने मंगळवारी सहा निष्पाप लोकांचा हकनाक बळी घेतला. 

अक्कलकोट स्टॅन्ड वरून “जलील बागवान” हा जीप चालक दहा लोकांच्या बसण्याची व्यवस्था आपल्या गाडीत असताना तब्बल सोळा ते सतरा लोक भरून पैशाच्या हव्यासापोटी सोलापुरकडे निघाला त्याने स्वतःची सीट सुद्धा केवळ 60 रुपयांसाठी दुसऱ्या प्रवाशाला दिली. आणि तो एका कडेवर बसून गाडी चालवू लागला अशात तो मोबाईलवरही बोलत होता, हे वाहन कुंभारी पासून पुढे काही अंतरावर आल्यानंतर रस्त्याचे काम चालू असल्याने एक खड्डा होता, प्रवाशांनी त्याला समोर खड्डा आहे असे सांगितले मात्र फोनवर बोलण्याच्या नादात गाडी खड्ड्यात आदळून रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिव्हायडरला धडकली आणि वेगात असल्याने ती थेट पलटी झाली मात्र या जलील बागवानने गाडीतून उडी मारली परंतु या गाडीमध्ये बसलेले पंधरा ते सोळा प्रवासी रस्त्यावर आणि रस्त्याच्या बाहेर फेकले गेले काही गाडीमध्ये चेंगरून गेले यामध्ये पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला.

त्यामध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश होता. एक युवा शिक्षक गंभीर जखमी झाल्याने तो उपचारादरम्यान दुपारी चारच्या सुमारास मरण पावला हे सर्व मयत अक्कलकोट तालुक्यातील होते त्यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची चौकशी केली आणि तातडीने तहसीलदार कडून अहवाल मागवणार असल्याचे सांगितले सर्व प्रवासी हे सामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. ते मिळेपर्यंत काही खरे नाही. 

सोलापूर जिल्ह्यात सध्या रस्त्यांच्या चौपदरीकणाचे काम चालू आहेत काही रस्ते पूर्ण झाले आहेत तर काही रस्ते अपूर्ण आहेत या चौपदरीकरणामुळे अपघाताचे प्रमाण काहीसे घटले आहे.

अक्कलकोट- सोलापूर या मार्गावर अनेक वर्षांपासून काळ्या- पिवळ्या जीप चालतात परंतू काही जीप वयोमान संपले असूनही त्या सक्रिय असल्याचेही समजते असे असताना त्या रस्त्यावर चालतात कशा? आरटीओ आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या नजरेत का पडत नाहीत? हा मोठा प्रश्‍न मंगळवारच्या अपघातानंतर उपस्थित होत आहे. 

पोटापाण्यासाठी अनेक युवक अशा जीप चालवतात परंतु प्रवाशांचे प्रमाण ठरलेलं असावं, गाडीचे इन्शुरन्स असावे, ही गाडी आउट डेटेड नसावी. प्रमाणाच्या बाहेर प्रवासी भरल्यानंतर अनेक वेळा असे अपघात सोलापूर जिल्ह्यात झालेले आहेत. त्या गाड्यांचे इन्शुरन्स नसते त्यामुळे मयत झालेल्या प्रवाशांना कोणतीही मदत मिळत नाही. निष्पाप गरीब लोक या प्रवासादरम्यान मरण पावतात. मंगळवारची घटना सकाळी अकराच्या सुमारास घडल्यानंतर त्या रस्त्यावर अनेक जीपा चालतात मात्र नंतर सर्व जीपा बंद होत्या अनेकांच्या तोंडून एकच शब्द बाहेर आला क्या रे बागवान, तुने तो हम सबको ‘जलील’ कर दिया.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : सव्वा लाखाची लाच मागितली माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी अँटीकरप्शनच्या जाळ्यात, गुन्हा दाखल

Next Post

सोलापूर : SRPF समादेशक विजयकुमार चव्हाण यांचा अक्कलकोट मित्र परिवाराच्या वतीने सन्मान जुन्या आठवणींना उजाळा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : SRPF समादेशक विजयकुमार चव्हाण यांचा अक्कलकोट मित्र परिवाराच्या वतीने सन्मान जुन्या आठवणींना उजाळा

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001030
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group