सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरळ सरळ गट आहेत. ती गटबाजी सोलापूरच्या राजकारणात स्पष्टपणे दिसून येते. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतात त्यामुळे सोलापुरातील अजितदादा समर्थकांकडे त्यांचे झुकते माप असते. मात्र त्यांना भेटण्यासाठी थेट शरद पवार साहेबांच्या संपर्कात असणाऱ्या अनेक नेत्यांना वेटिंग मध्ये राहावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे थेट पवार साहेबांशी संबंधित असतात त्यांचं आणि अजितदादाचं कितपत पटतं हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांचं पालकमंत्र्यांसोबत ही आजपर्यंत कधी जुळलं नाही. पालकमंत्र्यांचे एवढे दौरे येतात त्या एकाही दौऱ्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काका साठे दिसत नाहीत मात्र अजितदादा समर्थकांची रांगत यांच्या मागे असते.
पालकमंत्री जिल्हा परिषदेमध्ये आले असता त्यांनी सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य विरोधी पक्षनेते काका साठे यांच्या बाबत साधं विचारलं ही नव्हतं. डीपीसी सदस्य निवडीत पालकमंत्र्यांनी किती नेत्यांना विश्वासात घेतले? इंदापूरला उजनीतून पाणी देण्यावरून जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी दत्तात्रय भरणे यांचा तीव्र विरोध केला होता त्यामध्ये मग काका साठेसह इतर नेतेही होते, तेव्हापासून पालकमंत्री आणि काका साठे यांच्यात दरी दिसून आली.
मात्र उत्तर तालुक्यातील वडाळा गावात जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी पालकमंत्री दत्तामामांचा सत्कार घडवून आणला हा केवळ सत्कार नव्हता तर कौतुकसोहळा दिसून आला. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर इतकी स्तुतीसुमने उधळली ही उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं चित्र होतं.
पालकमंत्री भरणेमामांनी काका साठे हे जेष्ठ आणि विकसनशील नेतृत्व असून ते थेट पवार साहेबांच्या संपर्कात असणारे नेते आहेत माझं त्यांच्यावर बारीक लक्ष असतं, त्यांना निधीची कोणतीही कमतरता मी पडू देणार नाही असे सांगून काकांना महामंडळ मिळवून देण्यासाठी मी वकिली करेन असे आश्वासन दिले…👇👇👇
काका साठे यांनी आपल्या बिझी शेड्युलमधून भरणेमामानी वेळ काढून वडाळ्यात सत्कार घेतल्यामुळे आभार मानले, मला न मागता 25 लाखाचा निधी दिला अजून देतील असे सांगून पुढील काळात ही भरणेमामा हेच पालकमंत्री म्हणून सोलापूरला मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली…👇👇👇

















