सोलापूर – पंढरपूर तालुक्यांतील तावशी येथील कमल लेंडवे वय वर्ष 80 यांना सन 2017 साली स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मधुन शौचालयाचे लाभ व प्रधानमंञी आवास योजने मधुन घरकुल देणेत आले होते. आज ही आजी शौचालयाचा वापर करतात. आजीचे घरी ग्रामसेविका ज्योती पाटील यांनी भेट दिली. जागतिक शौचालय दिनी तिचा गौरव केला. सिईओ दिलीप स्वामी यांनी जागतिक शौचालय दिना निमित्त आज विविध उपक्रम घेणेचे आवाहन सर्व ग्रामपंचायतींना केले होते.
तसेच जागतिक शौचालय दिना निमित भारत यादव यांनी आज भरलेले शोषखड्डे सोनखत काढून शेतातील मातीत मिसळले. शौचालयातील शौषखड्डा खोदून त्यातील सोनखत काढून त्याचे प्रात्यक्षिके ग्रामसेवक ज्योती पाटील यांनी ग्रामस्थांना दाखविले. लेंडवे आजींना देखील शौचालय वापरत असलेबाबत ग्रामपंचायतीचे वतीने शुभेच्छा दिल्या.
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी अनवली येथे भेट देऊन शौचालय व आंघोळी साठी तयार करणेत आलेल्या बाथरूमच्या बांधकामास भेट दिली. लोक शौचालय बांधतात परंतू आंघोळी साठी बाथरूम बांधत नाहीत. ती देखील महत्वाची बाब असल्याचे ग्रामस्थांचे लक्षात आणून दिले.
जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हयात स्वच्छता उपक्रमास चांगला प्रतिसाद
जागतिक शौचालय दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्सात विविध गावात आज सांडपाणी व्यवस्थापना साठी शौषखड्डे व शौचालयाचे कामांना प्रारंभ करणेत आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलेल्या आवाहनास सुट्टी असून देखील अंगणवाडी मध्ये हात धुणेचे प्रात्यक्षिके तर विविध गावात शौचालये व सांडपाण्याचे शौषखड्डे घेणेत आले आहेत.
जिल्ह्सात जागतिक शौचालय दिनानिमित्त आज माळशिरस, पंढरपूर तालुक्यांत विशेष मोहिम घेणेत आली. मोहोळ, दक्षिण सोलापूर, सांगोला, माळशिरस, माढा, या तालुक्यांतील शौचालयाचे कामे सुरू करणेत आली. जांबुड येथे जागतिक शौचालय दिन निमित्त वैयक्तिक शौचालय बांधकाम सुरू करणेत आले. हगलूर ता. उत्तर सोलापूर येथे जागतिक शौचालय दिन साजरा करणेत आला .
स्वच्छतेची शपथ घेणेत आली.गावामधे स्वच्छता मोहीम राबवली व हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविणेत आले यावेळी वेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व गाव पातळी वरील कर्मचारी ग्रामस्थ इ उपस्थित होते.

















