सोलापूर दि. जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असलेल्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार देवून गौरविण्यात यावे अशी मागणी कास्टाईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षिरसागर यांनी मुख्यकार्यकारी अधिकारीदिलीप स्वामी यांचेकडे केली दिलीप स्वामी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी हि मागणी तात्काळ मान्य केली.
जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गीय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कास्टाईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकित प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी दिले. प्रशासना सोबत कास्टाईब संघटनेच्या पदाधिकरी यांनी विविध प्रश्ना संदर्भात चर्चा केली यात जिल्हा परिषदेमधील 1) सर्व संवर्गातील मागासवर्गीय अनुशेषाची बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेली पदे भरणेत आलेली नाहीत. तरी सदरचा अनुशेष विशेष मोहिम राबवून तात्काळ भरणेबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करावा. 2) सर्व संवर्गाच्या पदोन्नती होत असताना 7 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती व्हाव्यात .एखादया कर्मचाऱ्यांला मागासवर्गीय आहे.म्हणून डावलण्यात येऊ नये.तसेच चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना कनिष्ठ सहा. व व्रर्णोपचारक पदाची पदोन्नती देण्यात यावी.
3) जिल्हा परिषदेमधील सर्व विभागातील बिंदू नामवल्या तपासून अद्यावत ठेवाव्यात.4) सातवा वेतन आयोगानुसार सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांना 10,20,30 वर्षाची कालबध्द पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा.5) जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांचे व सेवा निवृत कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहाच्या 1 तारखेस करावे. 6)अदिसह चौकशी प्रकरणे, तात्पुरते वेतन प्रकरणे, ग्रामसेवक यांच्या समस्यासह ,पशुसंवर्धन व दिव्यांग कर्मऱ्यांच्या समस्या आदि विषयावर सकारात्मक चर्चा झाली.संघटनेच्या सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिलीप स्वामी यांनी दिले.
यावेळी झालेच्या चर्चेत कास्टाईब जि.प.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षिरसागर, चंद्रकांत होळकर यांनी सहभाग घेतला. तसेच संघटनेचे कार्याध्यक्ष भगवान चव्हाण, उपाध्यक्ष उमाकांत राजगुरु, मुख्य संघटक कल्याण श्रावस्ती, लक्ष्मण वंजारी, रमेश गायकवाड अदिनी सहभाग नोंदविला तर प्रशासनाच्या वतीने कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन साळुंखे, कनिष्ठ सहायक शेतसंदी व सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. संघटनेचे नागसेन कांबळे यांनी सर्वाचे आभार मानले.

















