सोलापूर : को-जनरेशनच्या चिमणीमुळे चर्चेत आणि अडचणीत आलेल्या सोलापूर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.निवडणूक अर्ज विक्री व स्वीकृती सुरू असून अर्ज दाखल करण्याची 2 डिसेंबर शेवटची तारीख आहे. मंगळवारी 14 जणांनी 15 अर्ज दाखल केले. त्यामध्ये अक्कलकोट तालुक्यातून 6, दक्षिण तालुक्यातून 8 व सोलापूर शहर 1 त्यामध्ये 14 ऊस उत्पादक मतदार संघ व 1 अनुसूचित जाती मतदारसंघातून अर्ज दाखल झाला आहे.
अर्ज दाखल केलेल्याची नावे पुढीलप्रमाणे आहेत..
झळकी सुरेश भिमशा, पाटील प्रकाश वरसप्पा, कांबळे चंद्रशा शंकर, अरवत भद्रसेन रेवणसिध्द, दुलंगे रमेश निलपा,बिराजदार मल्लिकार्जुन अणाराव, बिराजदार बापुराव विश्वनाथ,पाटील रावसाहेब जगदेव, कुंभार प्रकाश भिमराव, पाटोल विश्वनाथ श्रीमंत, धर्मशाळे दत्तात्रय तिपण्णा,बिराजदार सचिन षडाक्षरी, पाटील श्रीशैल हणमंतराव, बबलेश्वर भिमाशंकर कल्लप्पा


















