Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : हिम्मत असेल तर थेट वार करा, मी सगळ्या बाजूने खंबीर | दिलीप मानेंचा ‘वार’ कुणावर?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 November 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील उत्तर सोलापूर तालुका हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते काका साठे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्याच नावाने ओळखला जातो. काका आणि मालक एकत्र असले की कार्यकर्त्यांच्या उत्साहाला पारावार नसतो मात्र, ते जर एकमेकाच्या विरोधात गेले तर कायमच ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळते.

सध्या हे दोन्ही नेते एकमेकांवर दुखावलेले आहेत मिळेल त्या कार्यक्रमात एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. उत्तर सोलापूरच्या सभापती रजनी भडकुंबे यांचे वडील संभाजी भडकुंबे यांच्या होनसळ येथील शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिलीप माने यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या उत्तर पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी समाधान नागणे यांना उद्देशून आणि मजेदारपणे तुम्ही वडाळयाचे भावी जिल्हा परिषद सदस्य आहात असे वक्तव्य केले. 

त्यावरून नागणे यांना भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणणे निश्चितच काकांना सहन झाले नाही. तो राग त्यांनी नागणे यांच्यावरही काढल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता काकांच्या आजूबाजूला लुडबुड करणाऱ्या आणि त्यांचा वयोवृद्धपणा पाहून कान भरणाऱ्या कार्यकर्त्यांनी मालक आणि काका मध्ये कशी अजून आग लावता येईल याचे पुरेपूर प्रयत्न केल्याची चर्चा काकांच्याच जवळ असलेल्यामध्ये ऐकण्यास मिळाली.

काकांनीच बाजार समितीच्या निवडणुकीत 440 चा झटका देऊन पराभूत केलेल्या कंपनीला हाताशी धरून थेट उत्तर सभापतीच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. त्या दिवशी पूर्वनियोजित कट करून संभाजी भडकुंबे यांच्यावर हल्ला सुद्धा केला, मात्र कुणाला कशा पद्धतीने शह द्यायचा हे दिलीप मानेंना चांगलेच ठाऊक आहे आणि न्यायालयीन लढाईत ते कोणालाच ऐकत नाहीत हे खुद्द काका साठे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीवेळी माध्यमांना सांगितले होते आणि झाले तसेच.

सभापतीवर अविश्वास ठराव आणून ही या निवडीला उच्च न्यायालयातून स्थगिती आणली. वडाळा मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात काका साठे यांनी दिलीप माने यांच्यावर नाव न घेता टीका केली, राजकीय स्थिरता नसलेले लोक म्हणून नकळत डिवचले होते. या एकूणच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उत्तरच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हगलुर गावांमध्ये दिलीप माने यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.

या  कार्यक्रमाचा योगायोग म्हणजे या वाढदिवसानिमित्त झालेल्या क्रिकेट स्पर्धेत हगलुर गावाने वडाळा गावाला अंतिम सामन्यात हरवले हाच धागा धरून माने यांनी आपल्या भाषणात काय योग आहे पहा,, हगलुर गावाने वडाळ्याला हरवले मात्र काही जण समोर येऊन वार न करता पाठीमागून जाणीवपूर्वक माझ्या समर्थक,  अधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय हिंमत असेल तर थेट वार करा मी सगळ्या बाजूने खंबीर आहे अशा शब्दात त्यांनी तालुक्यातील विरोधकांना एक प्रकारे चॅलेंज दिले, हे शब्द उच्चारताच उपस्थित हजारो नागरिकांमधून टाळ्या आणि शिट्ट्या चा कडकडात झाला.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : सिद्धेश्वर कारखाना निवडणूक | 15 अर्ज दाखल | कुणी केले अर्ज दाखल पहा

Next Post

क्या बात है |जानेवारी अखेर ग्रामिणमध्ये 14 हजार घरकुल पूर्ण करण्याचा निर्धार | घरकुल लाभार्थ्याची नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन होणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

क्या बात है |जानेवारी अखेर ग्रामिणमध्ये 14 हजार घरकुल पूर्ण करण्याचा निर्धार | घरकुल लाभार्थ्याची नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन होणार

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979088
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group