सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मागील वर्षभरात केलेल्या चांगल्या कामाला त्यांच्या वर्षपूर्तीला लाचखोरीच्या दोन प्रकरणांने ग्रहण लागले. दिवाळी संपते नाच दुसऱ्याच दिवशी समाज कल्याण च्या दलित वस्ती विभागाच्या टेबलवर बसलेल्या कक्षाधिकारी बसवेश्वर स्वामी याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची रेड पडली आणि त्याचं दिवाळं निघालं.
यानंतर केवळ तिसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदेमध्ये दुसरी रेड पडली आणि सामान्य प्रशासन विभागातील सुहास चेळेकर यांना लाच मागितल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण झेडपी टेन्शनमध्ये आली.
समाज कल्याण विभागामधील सर्वाधिक निधी असलेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या टेबलला वर्षाला सुमारे 58 कोटीचा निधी येतो. स्वामीला अटक झाल्याने आणि तो निलंबित झाल्याने कामा पूर्वीच टक्केवारी दिलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. आता आपण दिलेले पैसे आपल्याला मिळणार का? ते काम मिळणार का? अशा चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात ऐकण्यात मिळाल्या. पोलिसांना स्वामीच्या घर झडती वेळी डायरी मिळाल्याची माहिती होती त्यामध्ये कोणाकडून किती पैसे घेतले? कुणाला किती दिले? त्याचा हिशोब त्या डायरीत असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली. मात्र नंतर त्या डायरीचे काय झाले हे कोणाला समजले नाही. आता ‘दलित वस्ती’चा टेबल कुणाला मिळणार याची मात्र मागील पंधरा दिवसात चर्चा होती.
आता माहिती समोर आहे की, दलित वस्तीला सर्वाधिक निधी असल्याने समाज कल्याणच्या दलित वस्तीचा टेबलवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन अधिकारी शिवानंद मगे यांना ‘बॉस’ करण्यात आले आहे. या कामासाठी आता मंगळवेढा पंचायत समिती मधून स्पेशली नरळे नावाच्या कर्मचाऱ्याला मुख्यालयात घेण्यात येत आहे. मूळ दलित वस्ती योजनेच्या टेबलावर नियुक्ती झालेल्या स्वाती गायकवाड ही महिला कर्मचारी ‘दलित वस्ती’ पासून वंचित राहिली आहे. जिल्ह्यात अकरा तालुके असून सहा तालुके नरळे व पाच तालुके गायकवाड यांना देण्याचे नियोजन वरिष्ठांनी केल्याची झेडपीत चर्चा सुरू आहे.
गायकवाड मॅडम पूर्ण जिल्हा मी बघू शकत नाही का? असा सूर काही पदाधिकाऱ्यांचा आहे, मात्र महिला म्हणून हे काम जमणार नाही अशी धारणा वरिष्ठांची असल्याची चर्चा आहे, या दोघांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मघे रावसाहेब राहणार आहेत. आता समाज कल्याणचा कारभार कशा पध्दतीने चालणार याकडे सर्वांच्या नजरा असून प्रशासनाच्या नियुक्तीला अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याची माहिती मिळत आहे.

















