Wednesday, October 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Job Alart | नोकरी इच्छुक युवक-युवतींनो इकडे लक्ष द्या…,करा असा अर्ज

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 December 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि.9 (जिमाका) : – राज्यात उद्योग व्यवसाय पुर्ववत सुरु झाल्याने रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत.  उमेदवारांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने  दिनांक 12 ते 17 डिसेंबर, 2021  या कालावधीत भव्य  राज्यस्तरीय महारोजगार  मेळाव्याचे आयोजन  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  त्या अनुषंगाने  https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सदर रोजगार मेळावा प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता चे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली आहे.

राज्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध नामांकित उद्योग व  व्यवसाय या मेळाव्यामधे सहभागी होत आहेत. एलजी इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., हायरॲप्लायन्सेस,महिंद्रा सीआय ई ऑटोमोटीव्ह लि., फियाट इंडिया प्रा. लि., आरएसबी ट्रान्समिशन इं. प्रा. लि., ग्रॅव्हिटी कन्स्ल्टंटस प्रा. लि., पिआयाजो व्हेकल्स, धूत ट्रान्समिशन आदी  नामांकित कंपन्यांसह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामधील कंपन्या या मेळाव्यात विविध प्रकारची रिक्तपदे नोंदवत आहेत .

या मेळाव्यात सर्वसाधारणपणे 9 वी  पास  पासून पुढे किंवा 10 वी व 12 वी,आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदांसह सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले असून, विविध क्षेत्रातील किमान 25 हजार रिक्तपदे उमेदवारांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

 हा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्यासाठी या विभागाच्या  https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट द्यावी. होमपेजवरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉबफेअर या बटनावर क्लिक करुन त्यातील “STATE LEVEL MEGA JOB FAIR 2021” या रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रताधारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घेऊन, उपलब्ध असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.

इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंती क्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.

तरी नोकरीइच्छुक उमेदवारांनी आपला पसंतीक्रम नोंदवून रोजगाराच्या या सुवर्ण संधीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहनही  सहायक आयुक्त जाधव यांनी केले आहे.

याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ड्रॉईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला (नॉर्थ कोट), पार्क चौक, सोलापूर येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा या कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक : पत्रकार खलील शहानूरकर यांचे निधन ; युवा पत्रकार गेला

Next Post

नाला खोलीकरण व रुंदीकरण कामात मोठा भ्रष्टाचार?जिल्हाधिकारी व सीईओ कडे तक्रार ; चौकशी होईना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

नाला खोलीकरण व रुंदीकरण कामात मोठा भ्रष्टाचार?जिल्हाधिकारी व सीईओ कडे तक्रार ; चौकशी होईना

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002133
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group