पंढरपूर :- पंढरपूर-मोहोळ मार्गावर मंगळवारी तुंगत जवळ तीन वाहनांच्या भीषण अपघातात 15 जण जखमी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूरकडे जाणार्या क्रूजरने रिक्षाला कट मारत ओमनी वाहनाला जोराची धडक दिल्याने ओमनी वाहनातील 5 जणांचा प्रकृती गंभीर आहे असून तसेच दुचाकीस्वार ही येऊन थटल्याने गंभीर जखमी झाला असून इतर गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती दिली आहे.
पंढरपूर-मोहोळ मार्ग मृत्यूचा सापळा झालाय. यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पंढरपूरहून दर्शन घेवून परतीच्या मार्गावर असणारे भाविक तुंगतनजीक एकतर्फी रस्त्यावर आले असताना मोटर सायकल क्र. एम.एच १३/४३४०,कु्रजर एम.एच २४/८९१६ ऍपे रिक्षा क्र. एम एच १४/०२२८,मारुती व्हॅन एम एच १३/९३३३ एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला. यामुळे वाहनातील भाविक रस्त्यावर फेकले. जखमींवर डॉ.योगेश रणदिवे यांनी प्रथमोपचार करून विठाई हॉस्पीटल या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.
















