सोलापूर -आसरा चौक येथून जूळे सोलापूर, विजापूर रोडकडे जाणा-या मार्गावर असलेला रेल्वे पूल अरुंद असल्यामूळे वहातूकीची दररोज कोंडी होते. या भागात शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालय, डी-मार्ट व रहिवास क्षेत्र असल्यामूळे तसेच साखर कारखान्याची ऊस वहातूक करणारी जड वहानांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. सदर रेल्वे पूल अत्यंत अरुंद असल्यामूळे या मार्गावर दररोज वहातूकीची कोंडी होते. तर या ठिकाणी छोटे-मोठे अनेक वेळा अपघात झालेले आहेत.
या ठिकाणी सतत नागरीक, वहानधारकामध्ये तक्रारी घडतात. तसेच भविष्यात देखील या ठिकाणी मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या अरुंद पूलावरुन जा-ये करणारी वहानांची संख्या, जूळे सोलापूर – विजापूर रोड परिसरात असलेली रहिवासी नागरीकांची संख्या या ठिाकणी आजवर झालेले अपघात व वहातूकीची कोंडी याचा विचार करून या पूलाची रुंदी तातडीने वाढवून या भागातील नागरीक, वहानधारकाची सोय करावी.
मार्डी ता. उत्तर सोलापूर येथील शेततळ्यात बुधवार 05जानेवारी रोजी तीन शालेय विद्यार्थीनीचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दूर्देवी घटनेमूळे या कुटूंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.या घटनेचा मंडल अधिकारी व गाव कामगार तलाठी यांनी पंचनामा करुन अहवाल उपविभागीय अधिकारी सोलापूर – 1 यांचेकडे सादर केलेला आहे.सदरची घटना अत्यंत मन हेलावणारी असून विजय गरड व यूवराज वडजे, या दोन्ही गरीब कुटूंबावर मोठा आघात झालेला आहे. तरी या कुटूंबाला तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी युवा मंचचे वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणेमामा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी युवा मंच अध्यक्ष सुनील बापू जाधव, समन्वयक उमेश भगत, अजित पाटील, सचिव तात्या कदम, विशाल भोसले, सतीश पाटील, अतिश बचुटे, श्रीनिवास भिंगारे, ओंकार केंगार, कमलाकर भोसले, अजय सोनटक्के, किरण बंडगर, सचिन ढेपे ,भैय्या पाटील,आेंकार शिंदे, किसन भिंगारे, अजय रेवजे, साेनाेपंत येलगुडे ,आकाश जाधव, दत्ता सुरवसे आदी उपस्थित हाेते.

















