भारती विद्यापीठाचे संस्थापक, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती, महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय डॉ. पतंगरावजी कदम यांच्या ७८ व्या जयंती निमित्त दि ०८ जानेवारी २०२२ रोजी •भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूर तर्फे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सुरूवातीला शैक्षणिक सकुल सेवक प्रा राऊत, प्रा. सी. आर. सुर्यवशी श्री सचिन सुर्यवंशी, डॉ. राहुल माजरे तसेच माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. जे. डी. पाटील, अभिजीत कदम इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड सोशल सायन्सेस सोलापूर चे संचालक डॉ. एस. बी. सावत यानी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आदरणीय डॉ. पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमेला फुले वाहुन अभिवादन केले.
यावेळी ग.सा.पवार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विजया गोळे बालविकास मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली मोहोळे मॅडम, समजकार्य विभागाच्या संचालिका डॉ. जयश्री मेहता, भारती सहकारी बँकेचे व्यवस्थापक श्री सुरेश सावत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अभिवादन सभेचे सुत्रसंचालन डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले.
















