सोलापूर : राज्यातील सर्व शाळा केवळ एक महिन्यांमध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय लागू झाला.
शनिवारी रात्री हा निर्णय झाल्यानंतर सोमवार 10 जानेवारी पासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील शाळा सुरू का बंद? याची चर्चा सोलापूर शहर जिल्ह्यात सुरू झाली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी कोरोना निर्बंधाचे आदेश काढले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या शाळांना अधिकृत शिक्षणाधिकार्यांच्या सहीने आदेश काढणे गरजेचे होते मात्र रविवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार हे कोल्हापूरला पळाले, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांचा फोन स्विच ऑफ होता मग शाळा बंद चा आदेश कोण? काढणार हा प्रश्न होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी हे समजताच ते चांगलेच संतापले या दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांनी झाप झाप झापले, कोरूना सारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर अधिकारी असे बेफिकीरपणे वागत असतील तर यांच्या तक्रारी थेट मुख्य सचिवांकडे करेन असा सज्जड दम स्वामी साहेबांनी भरल्याची चर्चा जिल्हा परिषदे मधून ऐकण्यास मिळत आहे. स्वामींच्या या प्रकोपामुळे लोहारच्या कारभारावर चांगलाच हातोडा पडला. तर हभप भास्करराव बाबर यांना मात्र काय राव भास्कर हे वागणं बरं नव्ह अशी चर्चा रंगलीय.

















