सोलापूर : माझे नेते दीपक आबा साळुंखे पाटील यांनी एक रुपया सुद्धा खायचा नाही अशा सूचना देऊन मला सभापती पदावर बसवले, त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची उकल केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असे सांगतानाच “होय मी आडमुठा” आहे पण जिल्हा परिषदेचे प्रशासन गेंड्याच्या कातडीचे आहे, मी काय करणार? अशी भाषा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोठे यांनी पत्रकारांशी बोलताना वापरली.
मागील सहा महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अनिल मोटे हे सभापती असतानाही विरोधकांच्या भूमिकेत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या टक्केवारीचा विषय त्यांच्यामुळे चांगलाच गाजला नंतर हा विषय कुठे गायब झाला हा संशोधनाचा विषय आहे.
दरम्यान सभापती मोटे यांनी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना पत्र देऊन जनसुविधा, नागरी सुविधा व तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सन २०२१.२२ मध्ये प्राप्त अनुदान, सदस्य निहाय अनुदान वितरण, सदस्य निहाय शिफारसी व त्यानुसार देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता आदेशाची प्रती तात्काळ आजच उलट टपाली या कार्यालयास सादर करणे बाबत संदर्भीय पत्रान्वये उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, सोलापूर यांना कळविण्यात आले होते. परंतू सदरहू माहिती अद्याप पावेतो या कार्यालयांस प्राप्त झालेली नाही.
तरी जनसुविधा, नागरी सुविधा व तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सन २०२१.२२ मध्ये प्राप्त अनुदान, सदस्य निहाय अनुदान वितरण, सदस्य निहाय शिफारसी व त्यानुसार देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता आदेशाची प्रती तात्काळ मिळणेकामी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, सोलापूर यांना आदेश होणेस विनंती आहे. सदरची माहिती दोन दिवसांत प्राप्त न झाल्यास नाईलाजास्तव मा. आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचेशी पत्रव्यवहार करावा लागेल. असा इशारा दिला होता.
याच पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये सभापती मोटे यांनी प्रशासनाला तब्बल दोन तास वेठीस धरले होते सभेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे इतर सदस्य हे सभा सोडून बाहेर पडले तरीही अनिल मोटे दोन तास बसून होते त्यांनी मागवलेली माहिती त्यांना अपेक्षित पणे मिळाली नाही म्हणून त्यांचे समाधान झाले नाही. शेवटी दोन तासानंतर अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सभागृह सोडले. मोटे यांच्या या आडमुठेपणाची चर्चा मंगळवारी दिवसभर जिल्हा परिषदेमध्ये होती.
सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली असता पत्रकारांनी त्यांना स्थायी समिती सभेमध्ये गोंधळ का? झाला असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी मी सहा महिन्यापासून माहिती मागवली मला जाणीवपूर्वक दिली जात नाही मग मी दोन तास प्रशासनाला वेठीस ठेवले तर त्रास का झाला? होय मी आठमुठा आहे मात्र हे आडमुठेपण जनतेच्या हिताचे आहे. जरी सभापती पदाचा कार्यकाळ संपला तरी पुढे एक नागरिक म्हणून जिल्हा परिषदेची माहिती मागण्याचा मला अधिकार आहे असे सांगून मोटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषदेमध्ये सध्या भेळमिसळ व खिचडी सत्ता असल्याने कुणाचा कुणाला मेळ नाही, कुणाचे नियंत्रण नाही, त्यामुळे कोण कशीही भूमिका घेत आहे. एकूणच अनिल मोटे यांचा पवित्रा पाहता त्यांना आता, कुणीतरी “आवरा रे” असाच पूर जिल्हा परिषदेमध्ये उमटत आहे.
















