सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सोलापूर दौऱ्यावर पासून त्यांचा शनिवारी शासकीय विश्रामगृहावर मुक्काम राहणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सुमारे दीड वर्षानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये ते शनिवारी सायंकाळी सहा वाजता पुण्याहून सोलापुरात येतील थेट दत्ता शिंदे यांच्या धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याला भेट देतील. तिथून रात्री नऊ वाजता सोलापुरात शासकीय विश्रामगृहावर येतील त्यानंतर मुक्काम राहील रविवारी सकाळी नऊ वाजता राजेश टोपे उस्मानाबादकडे प्रयाण करतील उस्मानाबाद मध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावून परत जालन्याकडे जातील.


















