सोलापूर : राजकीय कुणाच्या तरी दबावाखाली ही प्रभाग रचना झाली असून संबंधित अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली आहे.
नियोजन भवन येथे आज प्रारुप प्रभाग रचना हरकती सुनावणी निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी यांच्यासमोर घेण्यात आली.
यावेळी सोलापूर शहरातील विविध प्रभागाच्या हरकती स्वतः माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली होती निवडणूक आयोगासमोर हरकत घेऊन आल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, आत्तापर्यंत आठ निवडणुका झाल्या, वार्ड रचना जाहीर होतात, हरकती घेतल्या जातात, एकही गल्ली-बोळ बदलले गेले नाहीत, हाय तशाच निवडणुका झाल्या. आता आम्हाला संशय येतो की हा फार्स आहे का..? तसेच काही प्रभागांमध्ये 27 हजार लोकसंख्या असताना काही प्रभागात 21 हजार लोकसंख्या आहे हे कसं काय होऊ शकतं..? दोन्ही प्रभाग शेजारी आहेत, हे कशामुळे झाले. काही प्रभाग एका भिंती वरून वेगळे झाले आहेत निवडणूक आयोगाच्या नियमांचे पायमल्ली झाल्याचे यावेळेस पहावयास मिळाले.
निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे हे काम झाले पाहिजे तसे झाल्याचे पाहावयास मिळत नाही असेही देशमुख म्हणाले.
प्रभाग रचना कुणाच्या तरी दबावाखाली होऊन झाली आहे, ही चर्चा सोलापूर शहरात सुरु आहे त्यामुळेच या प्रभाग रचनेचा सर्व अटी नियम पायदळी तुडवले गेले आहेत. आमची मागणी सरकारकडे आहे की या सर्व नियमांची पायमल्ली केलेल्या, कुणाच्या तरी दबावाखाली येऊन रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली.
यावेळी महापालिकेचे सभागृह नेते शिवानंद पाटील, ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडी आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.


















