सोलापूर : नॉन व्हेज खवय्यांसाठी सोलापूर शहरात प्रसिद्ध असलेल्या खान चाचा हॉटेल मालकांचे घर फोडून तब्बल 28 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यानी लंपास केले. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सोलापूर हैदराबाद रोडवरील मंत्रीचंडक आंगन येथील दोन बंगल्यात धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल खान चाचाचे शफी खान व जे.डी.हार्डवेअर चे मालक जूनेद तिबंसवाला यांच्या घरात रात्री अज्ञात चोरांनी धाडसी चोरी करून लाखोंचे सोन्याची दागिने पळविल्याची फिर्याद दाखल झाली आहे.
असफर मोहम्मद शफी खान यांच्या फिर्यादीवरून २,४०,०००/- रुपये ८० ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे नेकलेस, २,४०,०००/- रु ८० ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे नेकलेस, १.२०,०००/- रु ४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या एकुण ४ बांगळ्या, १,२०,०००/- रु ४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या एकूण ४ बांगडया, ३०,०००/- रु १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या २ अंगठया, ४५,०००/- रु १५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या एकूण ३ अंगठया, ३०,०००/- रु १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३०,०००/- रु १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके असे सुमारे 8 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ही घटना घडली तेव्हा खान कुटुंबीय रविवारी पुणे येथे फिर्यादी च्या मावशीच्या मुलीच्या साखरपुडा च्या कार्यक्रमास गेले होते… रविवारी पुण्यात मुक्काम करून मंगळवारी पहाटे उशिरा सोलापुरात आल्यानंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे दिसून आले.
बंगल्या समोर कार उभी करताच बंगल्याच्या मेन गेटला लावलेले कुलूप दिसत नव्हते .बंगल्यात गेल्यानंतर बंगल्याचा मेन दरवाजा ही अर्धवट स्थितीत उघडा होता.. घरातील सर्व कपाट फोडलेले होते. सर्व सामान अस्ताव्यस्त झाले होते.. घरातील कपडे, रोख रक्कम सोने-चांदीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लुटला…हे लक्षात येताच तात्काळ त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. या वेळी शफी खान यांच्या बंगल्यासमोर असलेला जुनेद तिंबासवाला यांचेही घर फोडल्याचे आढळून आले.
पोलिसांना ही माहिती कळताच एमाआयडिसी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या सोबतच पोलीस आयुक्त हरीश बैजल हे सुद्धा मंगळवारी सकाळी ऑन दी स्पॉट घटनास्थळी दाखल झाले… पोलिसांचा मोठा फौजफाटा घटना स्थळी दाखल झाला. शहरातील राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या मंत्री चंडक अंगण मधील या घरफोडीने खळबळ उडाली आहे… ज्यांच्या घरात ही चोरी झाली घरफोडी झाली ते व्यक्ती शहरातील प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक आहेत… आता चोरांनी शहर पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे केले आहे.
















