सोलापूर : सोलापुरातील आंबेडकरी नेत्यांमध्ये नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि माजी नगरसेवक बबलू गायकवाड या दोघांची कट्टर मैत्री. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्सव मध्यवर्ती महामंडळ स्थापन झाल्याने या दोन्ही मित्रांच्या मैत्रीत आता दरार पडली आहे. उत्सव विश्वस्त समितीच्या बैठकीवेळी बबलू गायकवाड हे भाषणासाठी उठले असता त्यांना आता सर्व काही खुलून बोलावे अशी विनंती उपस्थित नेत्यांनी केली.
नाईलाजास्तव बबलू गायकवाड यांना आपले मित्र आनंद चंदनशिवे यांचे नाव न घेता तोंडसुख घ्यावे लागले. त्यांनी सर्वच पत्ते उघडले, “ऐ दोस्त तेरी दुश्मनी का कोई गम नही है, लेकिन गम तो इस बात का है, की तेरी दोस्ती मे दम नही है” बबलू गायकवाड यांनी आपल्या भाषणाने उत्सव समितीच्या बैठकीत बाजी मारली नेमके ते काय म्हणाले पहा


















