Wednesday, June 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची संवेदनशीलता ; मयत हनुमंत काळे यांच्या कुटुंबियांना मिळाला न्याय ; काय आहे ही ‘ positive’ बातमी नक्की वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 September 2023
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि. 24 (जि.मा.का.):- चंद्रभागाबाई यलगुलवार शाळेतील शिपाई हनुमंत विठ्ठल काळे  यांनी 10 ऑगस्ट 2023 रोजी मागील 12 वर्षापासून चुकीचा शालार्थ आयडी दिल्याने पगार मिळत नाही म्हणून शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली होती. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन मयताची पत्नी श्रीमती सुनीता हनुमंत काळे यांना तात्काळ अनुकंपा तत्वावर त्याच शाळेत शिपाई सेवक पदावर भरतीचे आदेश दिले होते.

कै. हनुमंत काळे यांनी तळ्यात उडी मारून आत्महत्या केल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांना याबाबत चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून याची चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला.      

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मयत हनुमत काळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना प्रशासनाच्या वतीने सर्व प्रकारची मदत देण्याबाबत आश्वासित केले होते. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या पुणे उपसंचालक कार्यालयाने मयत हनुमंत काळे यांच्या पत्नी श्रीमती सुनीता हनुमंत काळे यांना त्याच शाळेत शिपाई सेवक या पदावर अनुकंपा तत्वावर भरती करून घेतले. तसेच त्यांचा शालार्थ आयडी ही अत्यंत गतिमान पद्धतीने देण्यात आला. तर शिक्षण विभागाच्या दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजीच्या आदेशान्वये मयत हनुमंत काळे यांचे माहे सप्टेंबर 2011 ते 8 ऑगस्ट 2023 पर्यंतचे थकीत वेतन करण्यास मान्यता दिलेली आहे.

दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत मयत हनुमंत काळे यांचे प्रलंबित वेतन व त्यांच्या पत्नीला अनुकंपावर नोकरी मिळवून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून मयत काळे यांच्या कुटुंबीयांना कशा पद्धतीने लवकरात लवकर न्याय मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न केले. मयत काळे यांचा शालार्थ आयडी तात्काळ देण्याबाबतचे निर्देश शिक्षण उपसंचालक यांना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. त्यामुळे शासनाने मयत काळे यांचे थकीत असलेले बारा वर्षाचे वेतन देण्याचे आदेश नुकतेच दिलेले आहेत. 

तसेच मयताच्या पत्नीला त्याच शाळेत त्याच पदावर अनुकंपा तत्वावर भरती करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाला सुचित करण्यात आले व जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून मयत हनुमंत काळे यांच्या पत्नीचाही शालार्थ आयडी अत्यंत कमी कालावधीत प्राप्त झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या घटनेची घेण्यात आलेली दखल व यासाठी करण्यात आलेला पाठपुरावा यातून दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत मयत हनुमंत काळे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडण्यात आली. 

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपी कार्यकारी अभियंता खराडे झाले मोर ; संतोष कुलकर्णी झाले शाळकरी विद्यार्थी तर नाचले नरोटे, वानकर, पवार ; video

Next Post

झेडपीतील त्या पोतदार’वर प्रशासन एवढे मेहेरबान का?, पुन्हा मिळवली प्रतिनियुक्ती ; ‘शशी कपूर’ गेल्यास समाज कल्याणला कुलूप लागेल ; अधिकाऱ्याचे संशयास्पद वक्तव्य

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

झेडपीतील त्या पोतदार'वर प्रशासन एवढे मेहेरबान का?, पुन्हा मिळवली प्रतिनियुक्ती ; 'शशी कपूर' गेल्यास समाज कल्याणला कुलूप लागेल ; अधिकाऱ्याचे संशयास्पद वक्तव्य

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985956
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group