

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू
सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. बसखाली आल्याने सायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव रेवप्पा सोमनाथ कांबळे (वय 68) असून ते रेवणसिद्धेश्वर नगर, विजापूर रोड, सोलापूर येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रेवप्पा कांबळे हे एका अपार्टमेंटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. ड्युटी संपल्यानंतर ते सायकलवरून घरी जात असताना रंगभवन चौक परिसरात हा अपघात झाला.
या अपघातात ते बस क्रमांक MH 13 B 9801 या बसखाली आल्याने गंभीर जखमी झाले. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
















