Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 March 2026
in Social
0
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

सोलापूर : सोलापूरकरांनी प्रगतीसाठी विश्वासाने सर्व नगरसेवकांना निवडून दिले आहे. सोलापूरकरांनी दिलेली शहर विकासाची जबाबदारी पूर्ण करण्याला सर्व नगरसेवकांचे प्राधान्य असेल, असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले. उद्योगवर्धिनी संस्था आणि केतन वोरा मित्र परिवारातर्फे ५३ नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

उद्योगवर्धिनी संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, केतन वोरा, उद्योगवर्धिनी संस्थेचे मार्गदर्शक समिती सदस्य आनंद जोशी उपस्थित होते. याप्रसंगी नूतन नगरसेवकांचा शाल, पुस्तक, नॅपकिन बुके देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शिवसेनेचे गटनेते आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे गटनेते आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वैभव हत्तुरे, उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेधा राजोपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.

महापौर श्री. कोंड्याल म्हणाले, शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त माहिती मिळण्याकरिता सर्व नगरसेवकांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. पाणी, धुळमुक्ती, पर्यावरण, गोशाळा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विविध चाळींसह शहरातील नागरिकांना सुविधा, स्मशानभूमी सुधारणा आधी विषयांवर आगामी काळात काम करण्यात येणार आहे. उद्योगवर्धिनी संस्था विशेषतः महिलांसाठी सातत्याने उपक्रम राबवत आहे. समाजातील दहा हजार गरजू महिलांना रोजगार देण्याचे कौतुकास्पद काम उद्योगवर्धिनी संस्थेने केले आहे, असेही महापौर कोंड्याल याप्रसंगी म्हणाले.

उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान म्हणाल्या, सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन शहरातील १० समस्यांची यादी करावी. पक्षभेद विसरून सर्वांनी सोलापूरच्या विकासासाठी एकत्र येत या १० समस्यांचे प्राधान्याने निराकरण करण्यासाठी प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवत काम करावे. अभ्यासिका, वाचनालय, शैक्षणिक साहित्याची मदत, गरजू महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सहाय्य, समाज मंदिरे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणा या मुद्द्यांना सोलापूर महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे. नगरसेवकांनी नागरिकांसाठी सहज उपलब्ध असावे. आठवड्यातून एक दिवस नागरिकांना भेटण्यासाठीचे ठिकाण आणि वेळ निश्चित करावी, अशी अपेक्षाही चंद्रिका चौहान यांनी याप्रसंगी व्यक्त केली. स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, नागरिक कर्तव्य या पंचपरिवर्तनाच्या मुद्द्यांवरही नगरसेवकांनी काम करावे, असेही चंद्रिका चौहान याप्रसंगी म्हणाल्या.

भाजपाच्या शहराध्यक्षा आणि नगरसेविका रोहिणी तडवळकर म्हणाल्या, उद्योगवर्धिनी संस्थेने महिलांसाठी केलेले काम मोठे आहे. नगरसेवकांनी शहर विकासासाठीची आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. महिलांच्या उन्नतीसाठी आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवकांनी एकत्र येऊन योगदान द्यावे, असे आवाहनही शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले.

वैष्णवी पवार आणि कांचन श्रीराम यांनी श्लोक सादरीकरण केले. ऍड. गीतांजली चौहान यांनी संस्था परिचय करून दिला. प्रा. उत्तरा बरडे – बचुटे यांनी सूत्रसंचालन तर केतन वोरा यांनी आभार प्रदर्शन केले.

यावेळी उद्योगवर्धिनी संस्थेच्या सदस्या आणि केतन वोरा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Tags: Ketan VoraSolapur udyog vardhini
SendShareTweetSend
Previous Post

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

Next Post

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले 'समाधान' ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998869
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group